

Rise in Thefts at Akola Railway Station Sparks Safety Fears
Sakal
अकोला : जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या अकोला रेल्वे स्टेशनवर अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांत चिंताजनक वाढ झाली आहे. प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याचे प्रकार सलग घडत आहेत. मात्र या वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस दल (RPF) आणि जीआरपी (Government Railway Police) यांच्या गस्तीमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा तक्रार देण्यासाठी जरी गेला तरी ती आमची हद्द नव्हती असे म्हणून तक्रारदारासच हाकलून लावले जात असून त्यांना रामदास पेठ पोलिस स्टेशनचा रस्ता दाखवला जातो. जर हीच वेळ असेल तर सरकारने रेल्वे पोलीस दल आणि जीआरपी दल कशासाठी नेमले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.