अकाेला : कोवळ्या अंकुरांना पावसाचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Rain damage farmers crop

अकाेला : कोवळ्या अंकुरांना पावसाचा तडाखा

रिसोड - सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे पाणी साचल्याने तुरीचे व सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. परिणामी खरिपाच्या सुरुवातीलाच बळीराजावर आसमानी संकट कोसळले आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

खरीपाच्या नुकत्याच पेरण्या आटोपल्या. ऐन पेरणीच्या वेळी तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. पावसाने पिच्छा सोडला नाही. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीलाच घडीचा पाऊस झाल्यामुळे तसेच सोयाबीन व तूर ही पिके कोवळी असल्यामुळे पिवळी पडली आहेत. तुरीची पिके तर पाणी साचल्यामुळे संपूर्ण जळून गेली आहेत. नदीकाठची व पाणथळ शेतातील खरिपाची पिके पाणी साचल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इतर शेतातील पिकामध्ये तनाचा व किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तण नाशकाची फवारणी करून सुद्धा सततच्या पावसामुळे काहीही परिणाम झाला नाही.

ढगाळ वातावरण असल्यामुळे किडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. एकूण क्षेत्राच्या ५०% सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नदीकाठच्या तशीच पाण्याखाली गेलेल्या व पाणथळ शेताची पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

शेताला आले तलावाचे स्वरुप

मानोरा तालुक्यातील जनुना (खुर्द) ते नायणीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम झाले आहे. रोडलगतच्या नालीचे पाणी माझ्या शेतात घुसल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले असून शेतीची पाहणी करून संबंधितानी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकरी सुभाष इंगोले यांनी केली आहे.

Web Title: Akola Rain Damage Farmers Crop Kharif Water Soybeans Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..