अकोला : लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन बालिकेवर बलात्कार

नराधमाला २० वर्षांची शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कारSakal

अकोला : पातूर तालुक्यातील देविदास उत्तम ढोके याला लग्नाच्या बहाण्याने बलात्कार करून लग्नास नकार दिल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.

एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पातूर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. ढोके यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ढोकेविरुद्ध कलम ३७६,४०७,४५०, ५०६ पॉस्को कलम चार, पाच (एच) (दोन) (एल), सहा, आठ अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रकरण सुरू असताना गुणसूत्र (डीएनए) अहवाल आला. तो नकारार्थी होता. त्यामधे बालकाचे मातृत्व सिद्ध झाले; पण पितृत्व नाही.

हे प्रकरण पीडितेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे असून, बालकांचे पालकत्व सिध्द करण्याचे नाही, असा युक्तीवाद सरकारी वकील आनंद गोदे यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. पीडिता अल्पवयीन बालिका असून, तिचेवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला भा. दं. वी. चे कलम ३७६, ४५०, ५०६ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षणचे कलम तीन, चार, पाच, सहा कलमांतर्गत दोषी ठरवीले. ता. १८ ऑगस्टला नराधम ढोकेला शिक्षा सुनावण्यात आली.

लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्याचे कलम तीनसह कलम चार अंतर्गत दहा वर्षे सत्तमजुरीची शिक्षा व रक्कम रुपये दहा हजार दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण या कायद्याचे कलम पाचसह कलम सहा अंतर्गत २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व वीस हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधी कैद, भादंविचे कलम ४५० अन्वये तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवस साधी कैद तसेच भादंविचे कलम ५०६ अन्वये एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवस साधी कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावणी.

एकूण दंडाच्या रकमेपैकी रुपये तीस हजार पीडितेला देण्यात यावे, तसेच मनोधैर्य योजनेतून सदर पीडितेला मदत मिळावी याकरिता या निकालाची प्रत जिल्हा न्याय प्राधिकरण यांचे कडे सुपूर्द केल्यावर त्यांनी तसा पाठपुरावा करावा, असे जिल्हा न्यायाधीश क्रमांक तीन सुनील पाटील यांनी आदेश पारित केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ढोके आतापर्यंत चार महिने दोन दिवस कारागृहात होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com