Akola Ration e-KYC: ३१ ऑगस्टनंतर रेशनचा तांदूळ-गहू बंद?; २ लाख ३६ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी

31 August Deadline for Ration e-KYC in Akola: ३१ ऑगस्ट अंतिम मुदत असून, ई-केवायसी न केल्यास धान्य वितरण बंद होण्याची किंवा रेशनकार्डवरील नाव कमी होण्याची शक्यता आहे.
Akola Ration e-KYC

Akola Ration e-KYC

esakak

Updated on

अकोला: रेशनच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह काळाबाजाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने रेशनकार्डधारक लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात १३ लाख २० हजार २७८ लाभार्थ्यांपैकी १० लाख ८३ हजार ८२६ लाभार्थ्यांनी १९ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप २ लाख ३६ हजार ४५२ लाभार्थी ई-केवायसीपासून वंचित आहेत. ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, त्यानंतर ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होण्याची अथवा रेशनकार्डावरील नाव कमी करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com