esakal | 29 बोटांच्या 24 वर्षीय युवकाची आपबिती वाचा, अपंगत्वावर मात करून मिळवलेल्या रोजगार...
sakal

बोलून बातमी शोधा

akola Read the story of a 24-year-old man with 29 fingers, who lost his job after overcoming his disability.Read the story of a 24-year-old man with 29 fingers, who lost his job after overcoming his disability.

निसर्गदत्त अपंगत्वावर मात करून एका होतकरू तरुणाने संगणक अभियंतापर्यंतचे शिक्षण घेतले.... नोकरीला लागला... परंतु या कोरोनामुळे आता त्याला घरी परतावे लागले.... पुन्हा नोकरीच्या शोधात भटकंती सुरू झाली... हे वास्तव आहे लोणार येथील एका 24 वर्षीय तरुणाचे.

29 बोटांच्या 24 वर्षीय युवकाची आपबिती वाचा, अपंगत्वावर मात करून मिळवलेल्या रोजगार...

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा :  निसर्गदत्त अपंगत्वावर मात करून एका होतकरू तरुणाने संगणक अभियंतापर्यंतचे शिक्षण घेतले.... नोकरीला लागला... परंतु या कोरोनामुळे आता त्याला घरी परतावे लागले.... पुन्हा नोकरीच्या शोधात भटकंती सुरू झाली... हे वास्तव आहे लोणार येथील एका 24 वर्षीय तरुणाचे.


सुनील रतन वाणी हा लोणार येथील तरुण. त्याला जन्मतः अपंगत्व. त्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे बोटे नसून हाताच्या व पायाच्या बोटांची एकूण संख्या 29 एवढी आहे. यापैकी काही बोटांची हालचाल देखील होत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याला या अपंगत्वामुळे अनेक अडचणी यायच्या; परंतु जिद्द आणि परिश्रम या बळावर अपंगत्वावर मात करीत शिक्षण घेतले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

संगणक अभियंता म्हणून हैदराबाद येथे विप्रो कंपनीमध्ये नोकरी मिळाली. दरम्यान सर्व काही सुरळीत होते. नुकतेच आपण स्थिरस्थावर होत असल्याचे सुनीलला जाणवत असताना कोरोना नावाचा महाभयंकर आघात संपूर्ण जगावर झाला आणि आधीच अपंगत्वाशी लढत असलेल्या सुनीलला नोकरीपासूनही वंचित व्हावे लागले.

मनपा शिक्षकांच्या वेतनाचा पेच शासन अनुदानातून सुटणार, राज्यातील 17 महापालिकांपुढे वेतन अनुदानाचा प्रश्‍न

इतर सर्व क्षेत्रांमधील कामगारांप्रमाणे आज सुनीलला घरी परत यावे लागले आहे. आता पुन्हा नव्याने अपंगत्वावर मात करीत नव्या नोकरीच्या शोधात या युवकाला भटकावे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)