esakal | पेट्रोल पंप व्यवसायिक लाॅकडाउनचे नियम बसवतायेत धाब्यावर दुपारी दोन नंतरही केल्या जाते अवैध पेट्रोलची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Risod News Petrol Pump Commercial Lockdown Rules, Illegal sale of petrol is also done after two in the afternoon

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांनी वेगवेगळ्या पध्दतीने लाॅकडाउन जारी केला आहे. यामुळे शहरातील गर्दीला आळा बसून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंप व्यवसायिक मात्र लाॅकडाउनचे नियम धाब्यावर बसवून, दुपारी दोन नंतरही पेट्रोलची सर्रास विक्री करीत असून ही चिंतेची बाब ठरू शकते

पेट्रोल पंप व्यवसायिक लाॅकडाउनचे नियम बसवतायेत धाब्यावर दुपारी दोन नंतरही केल्या जाते अवैध पेट्रोलची विक्री

sakal_logo
By
पी.डी. पाटील

रिसोड (जि.वाशीम)  ः कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांनी वेगवेगळ्या पध्दतीने लाॅकडाउन जारी केला आहे. यामुळे शहरातील गर्दीला आळा बसून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंप व्यवसायिक मात्र लाॅकडाउनचे नियम धाब्यावर बसवून, दुपारी दोन नंतरही पेट्रोलची सर्रास विक्री करीत असून ही चिंतेची बाब ठरू शकते.


रिसोड शहरासह नजीकच्या काही गावांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहेत. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश प्रतिष्ठाने बंद करण्याचे तसेच शहरातील पेट्रोल पंप सुध्दा दुपारी दोन नंतर बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे सक्त आदेश आहेत. परंतु, रिसोड ते लोणी रोडवरील पेट्रोल पंपद्वारे दुपारी दोन नंतरही दुचाकी धारकांना खुले आम पेट्रोलची विक्री करताना दिसून येत आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पेट्रोल पंपावर आधिच नियमानुसार सुविधांचा बोजवारा उडालेला आसताना, आता बंदच्या कालावधीत सुद्धा नियमाची ऐशीतैशी करून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याऐवजी जोडण्यालाच हे पेट्रोल पंप धारक मदत करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

पेट्रोल विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
शहरातील अत्यावश्यक सुविधा वगळता पेट्रोल पंपासह बहुतांश प्रतिष्ठाने दुपारी दोन नंतर बंद करून दुसऱ्या दिवशी नऊ वाजता सुरू केले जातात. परंतु बंदच्या कालावधित सुद्धा रिसोड ते लोणी रोडवरील काही पेट्रोलपंप धारक खुले आम अल्पवयीन मुलाद्वारे पेट्रोल विक्री करताना दिसून येतात.

कोरोणा विषाणूची साखळी तोडण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू तर दुपारी दोन ते दुसऱ्या दिवशी नऊपर्यंत अत्यावश्यक कारणे वगळता बंद ठेवने आवश्यक आहे. परंतु बंद दरम्यान पेट्रोल विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांची तपासणी करण्यात येईल.
- अजित शेलार, तहसीलदार, रिसोड
(संपादन - विवेक मेतकर)