अकोला : जिल्ह्यात संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर

बाळापूर तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला
rain
rainsakal
Updated on: 

अकोला : केले आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले दुधढी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक बाळापूर तालुक्यातील अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्रातही वाढ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात गत २४ तासांत सरासरी ३१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात रिमझिम पाऊस झाली आहे. कुठे मुसधार तर कुठे रिमझिम पडणाऱ्या पावसांची संततधार सुरू असल्याने जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्यातील नदी-नाल्यांची पातळी वाढली आहे. विशेषतः बाळापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पूर्णा नदीवर असलेल्या विश्रोळी प्रकल्पाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले असल्याने अकोला जिल्ह्यात पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सांडव्यावरून वाहत आहे पाणी

बाळापूर तालुक्यात नवा अंदुरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी नागद, सागद, कारंजा, रमजानपूर, हातरुण या रस्त्यावरील पुलावरून जात असल्याने गुरुवार, ता. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. प्रवाशांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सर्तकतेचा ईशारा

कार्यकारी अभियंता पूर्णा प्रकल्प यांचे संदेशनुसार पूर्णा मध्यम ता. चांदूर बाजार प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पातून ३० क्युमेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास धरणामधून विसर्ग वाढविला जाऊ शकतो. तरी सर्व यंत्रणांनी संर्तक रहावे व नदी काठवरील गावातील ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)

अकोट ः २८.०

तेल्हारा ः २८.१

बाळापूर ः ३१.८

पातूर ः ४८.०

अकोला ः ३१.४

बार्शीटाकळी ः ३०.७

मूर्तिजापूर ः ३१.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com