अकाेला : खड्डेमय रस्त्याच्या कामाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Chincholi roads bad construction Work

अकाेला : खड्डेमय रस्त्याच्या कामाला सुरुवात

वाडेगाव - येथून जवळच असलेल्या चिंचोली रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे. खड्ड्येमय झालेल्या रस्त्यावर मॉन्सूनने हजेरी लावताच आपला चेहरा स्पष्ट केला. रस्त्यावर असलेले मोठ-मोठे खड्ड्यात पाणी जमा झाल्याने खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे?, असा प्रश्‍न नागरिकांसह वाहनधारकांना पडला होता. त्यामुळे ‘सकाळ’ने ‘रस्त्यात खड्ड्ये की, खड्ड्यात रस्ता?’ या मथळ्याखाली ता. २४ जून रोजी वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाला जाग आला आणि ता. ४ जुलैपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

वाडेगाव ते चिंचोली गणू हा पाच किलोमीटर अंतर असलेला रस्ता पूर्णपणे खड्ड्येमय झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मुळात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची ये-जा असल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्ड्ये पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्यामुळे काही खड्ड्यांचा अंदाज लागत नसल्यामुळे वाहने खड्ड्यात आपटत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन वाहनधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे अनेक वेळा दुचाकी वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा वाडेगाव-चिंचोलीसह परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु, संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना आजही त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांत कमीत कमी मुरूम टाकून खड्डे बुजवीण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

नागरिकांची व्यथा पाहून ‘सकाळ’ वृत्तपत्रात ता. २४ जून रोजी ‘रस्त्यात खड्ड्ये की, खड्ड्यात रस्ता?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच दहा दिवसाच्या आतच संबंधित विभागाकडून वाडेगाव-चिंचोली रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांनी ‘सकाळ’चे समाधान व्यक्त केले.

रस्त्यात पडलेले मोठ-मोठे खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रासदायक झाले होते. या रस्त्याने पायी चालणेही कठिण झाले होते. परंतु, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू झाल्यामुळे समाधान वाटत आहे.

- प्र.डी. गोतमारे, सरपंच, चिंचोली (गणू)

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे निवेदन दिले आहेत. परंतु, त्यांच्याकडून निवेदनाकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच रस्त्याच्या दुरुस्तीचे सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व गावकरी ‘सकाळ’चे आभार मानतो.

- अमोल सदार, ग्रा.पं.सदस्य, चिंचोली (गणू)

Web Title: Akola Roads Bad Construction Work Chincholi Road Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..