

Akola
esakal
अकोला: शहरातील गांधी चौक परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालयावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह १२ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १६ वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल शनिवारी (ता.३०) प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जे. गिडे यांच्या न्यायालयाने दिला.