Akola News: सालासार मंदिरात मध्यरात्री चोरी; एलसीबी, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक युनिट घटनास्थळी
Temple theft: अकोल्यातील सालासार मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली असून, एलसीबी, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक युनिट तपासात सहभागी झाले आहेत. दानपेटीतून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा अंदाज, पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.
अकोला : अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध सालासार मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. ही घटना रात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.