अरे हे काय? शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 27 June 2020

कोरोनाच्या पार्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु त्यासंबंधिचा निर्णय शासकीय शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समिती व खाजगी शाळांसाठी शाळा समितीने घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता. २६) जिल्ह्यातील सर्वच खाजगी व सरकारी शाळांमध्ये दोन्ही समित्यांची बैठक पार पडली. यावेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने यावेळी मात्र शाळेच्या पहिल दिवस विद्यार्थ्यांविनाच पार पडला.

अकोला  ः कोरोनाच्या पार्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु त्यासंबंधिचा निर्णय शासकीय शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समिती व खाजगी शाळांसाठी शाळा समितीने घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता. २६) जिल्ह्यातील सर्वच खाजगी व सरकारी शाळांमध्ये दोन्ही समित्यांची बैठक पार पडली. यावेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने यावेळी मात्र शाळेच्या पहिल दिवस विद्यार्थ्यांविनाच पार पडला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात २४ मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेविणाच उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असले तरी विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. त्याअंतर्गत टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्यात येतील. त्यासंबंधिचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. त्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

पंधरवाड्याला सुरुवात
शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने पूर्व तयारीअंतर्गत पंधरवडा राबवायचा आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समितीची (ऑनलाईन) सभा आयोजित करणे, पाठ्यपुस्तक वितरण, शाळेच्या इमारतीचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, गटागटाने पालकांच्या सभा घेणे, शाळा बाह्य मुलांच्या घरी भेटी देणे, शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाचे अद्यावतीकरण करणे. ग्रामपंचायतींच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर यांची सुविधा उपलब्ध करुन मुलांना मदत करणे, गुगल क्लासरुम, वेबिनार, डिजीटल शिक्षणासाठी शिक्षक व पालकांचे सक्षमीकरण करणे, दीक्षा ॲपचा प्रसार, ई-कन्टेंट निर्मिती इ. बाबत तयारी करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

असे आहे संभाव्य वेळापत्रक
० जुलै महिना ः इयत्ता ९ वी, १० वी व १२ वी वर्ग सुरु होतील.
० ऑगस्ट महिना ः इयत्ता ६ वी ते ८वी चे वर्ग सुरु होतील.
० सप्टेंबर महिना ः इयत्ता तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरु होतील.
० इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग केव्हा सुरु करायचे याबाबत स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यायचा आहे
० इयत्ता अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola school first day without student, school managment commity meeting