शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास

शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास

अकोला : अल्‍पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश पिंपरकर यांच्या न्यायालयाचे शनिवारी (ता. ५) तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. याव्यतिरिक्त आरोपीला दंड सुद्धा ठोठावण्यात आला आहे. (Akola Crime News)

या प्रकरणी न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी करण समाधान दामोदर हा पिडीत अल्पवयीन मुलाला नेहमी त्रास देत असे. सदर आरोपी हा पीडितेस ती शाळेत जात असताना रस्त्यात अडवून असभ्य वर्तन व वार्तालाप करत असे, पिडीतेने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली होती. घटनेच्या दिवशी वडील तिच्या मागे मागे गेले असता रस्त्यात आरोपीने पीडितेस अडवले असता वडिलांनी त्यास पकडले व पीडितेच्या शाळेत नेले, तेथून शिक्षकांनी पोलिसाना बोलाऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात दिले व पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी नुसार कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: सातारा-पंढरपूर मार्गावर आगीत एसटी बस जळून खाक

त्यानंतर प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला व प्रकरण न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार तर्फे ६ साक्षिदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. साक्षिदारांच्या साक्षी व इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी करण समाधान दामोदर यास अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपात दोषी ठरवून भादंवि कलम ३५४ मध्ये ३ वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, ३५४ ड मध्ये ३ वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, तसेच पोक्सो कायदा कलम ११ मध्ये ३ वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा विद्यमान विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.डी. पिंपरकर यांच्या न्यायालयात शनिवारी (ता. ५) ठोठावण्यात आली. आरोपीला सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत. सदर प्रकरणाचा तपास एपीआय किशोर वानखडे यांनी तपास केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Akolacrime