सातारा-पंढरपूर मार्गावर आगीत एसटी बस जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus Fire
सातारा-पंढरपूर मार्गावर आगीत एसटी बस जळून खाक

सातारा-पंढरपूर मार्गावर आगीत एसटी बस जळून खाक

म्हसवड : सातारा -पंढरपुर रस्त्यावरील माण तालुक्यातील धुळदेव येथे आज दुपारी साडेबारा वाजता आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या बर्निंग एसटी चा थरार एसटी चालकाच्या प्रसंग अवधामुळे ४४ प्रवाशांचे प्राण वाचले व कोणतीही जीवित हानी नाही. मात्र संबंधित संपुर्ण एसटी बस जळून खाक होऊन फक्त सांगाडा शिल्लक राहिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा आगाराची एम एच ११ बी एल ९३ ५५ एसटी बस सोलापूरला जात असताना म्हसवड पासून पूर्वेस सुमारे सात किलोमीटर अंतरावरील धुळदेव या गावाच्या बस थांबाच्याच्या ठिकाणी एक वयोवृध्द त्यांच्या एसटीतून उतरत असताना इंजिन मधून धूर येत असल्याचे चालक शंकर पवार त्यांच्या लक्षात आले. (Satara Bus Fire Accident)

त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून बस मध्ये प्रवासास बसलेल्या ४४ प्रवाश्यांना वाहक सुधीर जाधव यांना तात्काळ खाली उतरवण्या सांगितले.त्यानंतर एसटी चालक जाधव यांनी सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्यानंतर पाच दहा मिनिटातच आगीने रुद्र रूप धारण केले व संपूर्ण बसने पेट घेतला.

हेही वाचा: PMPML: पीएमपी प्रवासात चोरट्यांचा उच्छाद

या घटननेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्यात देण्यात आली असता पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातजीने दाखल झाले व त्यानंतर पेलिसांनी तात्काळ म्हसवड पालिकेशी संपर्क साधून अग्निशमन दलाचा बंब बोलावून घेऊन पेट घेतलेली एसटी विझवण्याचा प्रयत्न केला याकामी नगरपालिकेचे कर्मचारी प्रकाश पिसे व नवनाथ वलेकर यांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम केले.परंतू संपुर्ण एसटी बस जळून खाक झाली व फक्त सांगाडा शिल्लक राहिला.

यावेळी दहिवडी येथील प्रवासी सुरज अडसूळ हे सोलापूरला याच अपघातग्रस्त एसटी मधून कामानिमित्त निघाले असता त्यांनी दै,सकाळच्या बातमीदारांशी बोलताना सांगितले एसटी ड्रायव्हर शंकर पवार व चालक सुधीर जाधव यांच्या यांच्या प्रसंगावधानाने आज आज ४४ प्रवाशांच्या जीव वाचवला आहे आमच्यावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती आमचे दैवत बलवत्तर होते म्हणून आम्ही बचावलो असल्याची भावना व्यक्त केली.