शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा ‘दादा’गिरी !

विवेक मेतकर
Tuesday, 1 September 2020

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पांडुरंगदादा पाटील यांची गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता होती. त्यांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांचे मार्गदर्शन होते. या दोघांनी मिळून सहकार पॅनलचे वर्चस्व कायम ठेवले.

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पांडुरंगदादा पाटील यांची गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता होती. त्यांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांचे मार्गदर्शन होते. या दोघांनी मिळून सहकार पॅनलचे वर्चस्व कायम ठेवले.

पण गेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे आठच संचालक निवडून आले, तर परिवर्नचे १० संचालक आल्याने परिवर्तनचे गोविंद मिरगे सभापती झाले. पण थोड्याच कालावधीत पांडुरंगदादांनी कायद्याने मिरगेंना बडतर्फ करीत पुन्हा सहकारची सत्ता आणली आणि श्रीधर उन्हाळे यांना सभापती बनवले. त्यामुळे त्यांनी आपली ‘दादा’गिरी पुन्हा सिद्ध केली, हीच चर्चा होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परिवर्तन पॅनलच्या बडतर्फ सभापतीकडून बाजार समितीमधील रकमेचा अनाठाई खर्च करून अपहार करण्यात आला होता. यासंदर्भात बडतर्फ सभापती चौकशीअंती दोषी आढळले. जिल्हा उपनिबंधकांनी कायद्यानुसार त्यांना बडतर्फ केले आहे.

च्या बडतर्फीनंतर बाजार समितीचे सचिव विलास फुंडकर यांनी बडतर्फ सभापतींना अनाठाई खर्चाच्या वसुलीसाठी नोटिससुद्धा पाठवली होती. आज स्थानिक बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहकार पॅनलचे श्रीधर उन्हाळे यांची सभापतीपदी निवड केली गेली.

निवडीच्या वेळी सभापतींसह काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर ज्ञानेश्वरदादा पाटील, पांडुरंगदादा पाटील, शैलेंद्रदादा पाटील, कैलासबाप्पू देशमुख, जयंतराव खेळकर, गजानन हाडोळे, बाजार समितीचे सचिव विलास फुंडकर, विनोद फुंडकर, नागोराव डाबेराव, अनंत शेगोकार, नितीन तायडे, पुंडलिक भिवटे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Shegaon Agricultural Produce Market Committee Election