शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

शेगावचं गजानन महाराज मंदिर आदेश येईपर्यंत बंद ठेवणार आहेत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. अमरावतीत रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनसदृष स्थिती आहे. विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांसाठी संचारबंदीचे आदेश अधिक कडक केले आहेत.पुढील आदेशापर्यंत देऊळ बंदचा निर्णय श्री संत गजानन महाराज संस्थानेतनं घेतला आहे.

बुलढाणा : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील शेगावचं गजानन महाराज मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातही ५६ तास बंद करण्यात आलं आहे. यावेळी भाविकांना दर्शन घेता येणार नाही.

शेगावचं गजानन महाराज मंदिर आदेश येईपर्यंत बंद ठेवणार आहेत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. अमरावतीत रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनसदृष स्थिती आहे. विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांसाठी संचारबंदीचे आदेश अधिक कडक केले आहेत.पुढील आदेशापर्यंत देऊळ बंदचा निर्णय श्री संत गजानन महाराज संस्थानेतनं घेतला आहे.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुकीत कोरपे गटाचे वर्चस्व!. सहकार पॅनलचे सर्व सदस्य विजयी

कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यांतल्या अनेक मोठ्या शहरांत पाहायला मिळतो आहे तसा तो ग्रामीण भागांत देखील पाहायला मिळतोय. विदर्भात तर कोरोनाने गेल्या 10 दिवसांपासून कहर केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

पुढील आदेशापर्यंत गजानन महाराज मंदिर बंद
सद्यस्थितीत राज्यभरात कोरोना विषाणूचाा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसंच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणं शक्य नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना बंदी करण्यात आलीय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला निर्णय असल्याचं संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी-नियमांचं पालन संस्थान करत असल्याचंही संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Shegaon Corona News Shegaons Gajanan temple closed for devotees, administration on alert mode!