शिक्षक समृद्धी पतसंस्था घोटाळ्यातील अध्यक्ष, सचिव अटकेत दहा आरोपी संचालक अद्यापही फरार

akola Shikshak Samrudhi Patsanstha scam president, secretary arrested Ten accused directors are still absconding
akola Shikshak Samrudhi Patsanstha scam president, secretary arrested Ten accused directors are still absconding

अकोला  ः महापालिकेच्या शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेमध्ये 2012 ते 2017 या पाच वर्षात तब्बल लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संस्थेचा अध्यक्ष नरेश बाबूलाल मूर्ती आणि व्यवस्थापक नीलेश सुधाकर गुहे या दोघांना अटक केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेत अतिरिक्त भाग भांडवल, अनामत रक्कम काढणे, खोट्या नोंदीद्वारे रक्कम काढणे, खर्चाची देयके नसताना रक्कम अदा करणे, बोगस सभासद दाखवून रक्कम अदा करणे यांसह विविध प्रकाराने मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवरून जिल्हा उप-निबंधक कार्यालयाचे लेखा परीक्षकांनी गैरव्यवहाराचा अहवाल तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या अहवालानुसार शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेच्या कागदपत्रांची पडताळणीत ते दरम्यान अध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापक यांनी लाख हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नरेश बाबूलाल मूर्ती रा. रामनगर म्हाडा कॉलनी रतनलाल प्लॉट, व्यवस्थापक नीलेश सुधाकर गुहे रा. साई नगर, जुने शहर यांच्यासह शरद पांडुरंग टाले, उपाध्यक्ष रा. स्वालंबी नगर गोरक्षण रोड, नानाजी नीळकंठ किनाके माजी सचिव रा. खदान, किशोर श्रावण सोनटक्के सचिव रा. शिवाजी नगर, सुनीता रवींद्र चरकोलू संचालिका रा. गड्डम प्लॉट, नसिहा तबस्सुम मो. हातीम संचालिका रा. फिरदोस कॉलनी, रागिनी सदानंद घरडे संचालिका रा. गुलजारपुरा, प्रकाश डिगांबर फुलउंबरकर संचालक रा. फडके नगर, डाबकी रोड, नितीन त्र्यंबकसा नागलकर रा. शिवाजी नगर, संगीतराव पुंडलीकराव थोरात रा. नगर परिषद कॉलनी, गजेंद्र माणिकराव ढवळे रा. पोळा चौक, सोनटक्के प्लॉट या आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल क रून आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com