अखेर अकोला जिल्हा शिवसेनेत फुट; २६ जण शिंदे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopikishan Bajoria

अखेर अकोला जिल्हा शिवसेनेत फुट; २६ जण शिंदे गटात

अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने अखेर अकोला जिल्हा शिवसेनेत फुट पाडण्यात यश मिळविले. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे आमदार पुत्र विप्लव बाजोरिया व माजी नगरसेवकांसह २६ जणांनी गुरुवारी मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर तत्काळ बाजोरिया यांची अकोला जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेले काही दिवसांपूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्यासोबत कोण जाणार याबाबत उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी बाजोरिया पिता-पुत्र व त्यांच्यासोबत युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवकांसह शशिकांत चोपडे, अश्विन नवले, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल आदींसह एकूण २६ जण मुंबईत दाखल झाले होते.

या सर्वांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईत सह्यांद्री अतिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचे जाहिर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व त्यांचे आमदार पुत्र विप्लव बाजोरिया, युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, योगेश अग्रवाल यांच्‍यासह माजी नगरसेवक व इतर सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे यांनी अकोला जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी बाजोरिया यांच्याकडे सोपवत असल्याचे जाहिर केले. अकोला जिल्ह्यात पक्ष बांधणी सर्व जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. शिंदे गटातील अकोला जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही लवकरच केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Akola Shiv Sena Split 26 Join Cm Eknath Shinde Mla Gopikishan Bajoria As Akola District Liaison Head

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..