ब्रेकींग: शाळेत फिरयला गेला... अन् अचानक त्याने केला मुख्याध्यापकावरच गोळीबार

राम चौधरी 
Friday, 24 July 2020

शाळेमधे संस्काराचे बाळकडू दिले जातात, शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडते मात्र मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क देशी कट्ट्यातून मुख्याध्यापकावर गोळी चालविल्याची धक्कादायक घटना आज ता.23  ला घडली आहे.

वाशीम :  शाळेमधे संस्काराचे बाळकडू दिले जातात, शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडते मात्र मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क देशी कट्ट्यातून मुख्याध्यापकावर गोळी चालविल्याची धक्कादायक घटना आज ता.23  ला घडली आहे.

या गोळीबारात माथेफिरूचा सुदैवाने नेम चुकला नाहीतर मुख्याध्यापकाचा गेम वाजलाच असता.  

मालेगाव पासून वाशीम रोडवर अमानी गाव आहे. या गावामधे जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार विजय बोरकर या शिक्षकाकडे आहे.शुक्रवारी सकाळी मुख्याध्यापक विजय बोरकर व त्यांचे सहकारी शिक्षक टिचररूमधे बसले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्या शाळा सुरू नसल्या तरी शाळेमधे शिक्षकांना हजर रहावे लागते. शाळेत दैनंदिन कामकाज सुरू असताना अमानी येथील माथेफिरु युवक सुशांत समाधान खंडारे हा शाळेत आला. पहिल्यांदा त्याने वर्गखोलीत फेरफटका मारला नंतर त्याने जवळचा देशी कट्टा काढून पुन्हा या शिक्षकाकडे आला. मात्र हा कट्टा खरा असेल याची कल्पनाही या शिक्षकांना नव्हती.

त्यानंतर या माथेफिरूने चक्क विजय बोरकर यांना शिविगाळ करत त्यांच्यावर कट्टा रोखला. काही कळायच्या आत त्याने कट्ट्याचा खटकाही ओढला मात्र प्रसंगावधान राखत विजय बोरकर यांनी खाली वाकून गोळी चुकवली. मात्र ही गोळी बोरकर यांच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी कपाटाला भेदून गेली.

हे अवघ्या काही सेकंदात घडले असताना या माथेफिरूने चक्क दुसरा कट्टा काढला मात्र खोलीत असलेल्या शिक्षक व गोळी चालल्याचा आवाज आल्याने शाळेत आलेल्या काही नागरीकांनी माथेफिरूला बाहेर ढकलले.

अरे हे काय ? फवारणीचा काळ अन् जनजागृतीचा दुष्काळ, विषबाधा टाळण्याचा प्रशासनाला पडला विसर

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंग सोळंके यांनी घटनास्थळी दाखल होत माथेफिरूला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे शाळेतील शिक्षकांमधील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत असून हा प्रकार सुपारी प्रकारातील असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणामधे पोलिस तपास करीत आहेत.

(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola shocking: He fired a shot at the headmaster of Washim school