Akola : श्री शिवाजी महाविद्यालय नॅकमध्ये ‘ए डबल प्लस’

विदर्भातील पहिलेच महाविद्यालय; विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक गुणवत्तेतही अव्वल
NAAC
NAACsakal
Updated on: 
Summary

विदर्भातील पहिलेच महाविद्यालय; विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक गुणवत्तेतही अव्वल

Summary

अकोला : श्री शिक्षण संस्थेच्या अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला बेंगळुरू येथील नॅक समितीने ‘ए प्लस प्लस सीजीपीए ३.५८’ हा दर्जा दिला आहे. चौथ्या मूल्यांकनात नॅक समितीकडून हा दर्जा मिळविणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत व विदर्भातील पहिलेच महाविद्यालय आहे.

नॅक समितीने ता. १० व ११ ऑक्टोबर २०२२ रोज महाविद्यालयाला भेट देवून पाहणी केली होती. उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने बेंगळुरू येथील नॅक समितीची स्थापना केली आहे. दर पाच वर्षांनी महाविद्यालयांचा दर्जा तपासून गुणांकन करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार श्रीधर, प्रोफेसर मुश्ताक अहमद झर्गर आणि प्रोफेसर सुमत अग्ररवाल यांनी श्री शिवाजी महाविद्यालयाला भेट दिली होती. दोन दिवसीय भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाचे सुष्म निरीक्षण केले. प्राचार्य डॉ. ए.एल. कुलट यांनी संपूर्ण प्रसुततीकरण व संवा साधला.

त्यानंतर आयक्यूएसी समन्वयक डॉ. आशीष राऊत व समितीन सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्या सोबत संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर आणि कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्यासोबतही नॅक समितीने संवाद साधला. कार्यालय परीक्षण व विस्तारित विभागाची पाहणी समितीने केली.

समितीने विद्यार्थी, पालक आमि माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर ता. १८ ऑक्टोबरला नॅक समितीचा निकाल महाविद्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. कुलट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. आशीष राऊत, डॉ. संजय शेंडे, डॉ. अंजलीकावरे, डॉ. प्रतीक्षा कोकटे, डॉ. संजय पल्हाडे आदींची उपस्थिती होती.

सात निकषांवर मिळाला दर्जा

नॅक समितीने महाविद्यालयाची पाहणी करताना सात निकष निश्चित केले होते. त्यात शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची पदवीनंतर पदव्युत्तर व पी.एच.डी. करण्याचे प्रमाण, संशोधनातील विद्यार्थी व प्राध्यापकांचे योगदान, पायाभूत सुविधा, दिव्यांगासाठी शैक्षणिक व पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीचे प्रयत्न, व्यवस्थापनाचे सहकार्य, समाजासाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन या निषकांचा समावेश होता, अशी माहिती डॉ. आशीष राऊत यांनी दिली.

विद्यार्थ्यांना सहकार्य करणे जमेची बाजू

श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने केलेली सर्वांगिन मदत ही नॅक समितीच्या तपासणीतील महाविद्यालयाची जमेची बाजू ठरली. ‘शिका आणि कमवा’ या योजनेतून अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. याबाबी समितीच्या मूल्यांकनात जमेच्या ठरल्याचे प्राचार्य डॉ. कुलट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com