कुशल मनुष्यबळ विकासाला घरघर!,तरुणांना ‘कुशल’ बणवण्याच्या कार्यक्रमाला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 4 July 2020

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक घटकांवर पहायला मिळत आहे. उद्योग, व्यापारांची गती मंदावली आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे. परंतु या स्थितीत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राबविण्यात येणारा कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ठप्प पडला आहे. त्यामुळे हाताला काम नसणाऱ्या युवकांच्या कौशल्य विकासाच्या संधी सुद्धा कोरोनाने हिरावल्याचे दिसून येत आहे.

अकोला  ः कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक घटकांवर पहायला मिळत आहे. उद्योग, व्यापारांची गती मंदावली आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे. परंतु या स्थितीत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राबविण्यात येणारा कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम ठप्प पडला आहे. त्यामुळे हाताला काम नसणाऱ्या युवकांच्या कौशल्य विकासाच्या संधी सुद्धा कोरोनाने हिरावल्याचे दिसून येत आहे.

तरुणांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून केंद्र शासनातर्फे सन् 2009 मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात सुद्धा राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात सन् 2010 पासून करण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक महिन्यात राज्यातील हजारो तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रांमध्ये ‘कुशल’ बनवण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे युवकांच्या कार्य कर्तुत्वात सुधारणा होत असून ते रोजगारक्षम बनत आहेत. परंतु कोरोनामुळे देशभरात 24 मार्चपासून टाळेबंदी (लॉकडाउन) लागू करण्यात आली. त्यानंतर गत एक महिन्यापासून अर्थचक्राला गती देण्यासाठी मिशन बिगीन अगेन सुरु करण्यात आले. या तीन-चार महिन्यांच्या काळात युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत नसल्याने कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती व विकासास घरघर लागली आहे.

भाजपमध्ये धुमसतोय मराठी अमराठी वाद,  जुने कार्यकर्ते बेदखल; शहर कार्यकारिणीच्या निवडीमध्ये फुटले वादाला तोंड

या प्रशिक्षणांना लागला ‘ब्रेक’

  •  केंद्र शासन पुरस्कृत योजना ः प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विशेष कृषी प्रकल्प
  • केंद्र व राज्यशासन पुरस्कृत योजना ः दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, उपजीविकेसाठी कौशल्य संपादन ज्ञान जागरुकता अभियान
  • राज्य शासन पुरस्कृत ः प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, विधवा, परितक्ता व घटस्फोटीत महिलांकरीता कौशल्य प्रशिक्षण, इयत्ता 10वी व 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण
  • जिल्हा पुरस्कृत योजना ः किमान कौशल्य विकास कार्यक्रम-जिल्हा नियोजन समिती

कोरोनामुळे कौशल्य विकास कार्यक्रम गत काही दिवसांपासून जिल्ह्यात बंद आहे. शासनाने सप्टेंबर महिन्यापासून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सप्टेंबरपासूनच कुशल मनुष्यबळ विकासाला गती मिळेल.
- सुधाकर झडके,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Skilled manpower development in full swing!, Break in the program to make the youth skilled