Akola News: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात;कृषी विद्यापिठाच्या तज्ज्ञांचे संशोधन, शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज

Current Status of Soil Health in Akola: अकोला जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. मृद विज्ञान संशोधनानुसार नत्र, स्फुरद आणि इतर घटकांचा तुटवडा लक्षात आला.
Akola News

Akola News

esakal

Updated on: 

अकोला: आधुनिक शेतीमध्ये सुधारित वाणांच्या वापरामुळे उत्पादकता वाढली असली, तरी माती आणि पाणी यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा असंतुलित वापर होत आहे. यामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचा ऱ्हास होऊन जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वापराचा अभाव आणि अन्नद्रव्यांचे असंतुलन यामुळे जमिनीची सुपीकता खालावत असल्याची धक्कादायक माहिती कृषी विद्यापिठाच्या मृद विज्ञान विभागाच्या संशोधनात समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com