

Akola News
esakal
अकोला: मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी जिल्ह्यात जागोजागी होत आहे. जरी योजनेला नाव मुख्यमंत्री यांचे आहे; परंतु काम खासगी कंपनी करीत आहे. या कंपनीला अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभलेले आहे, असा आराेप करीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. यावेळी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.