अकोला : परिस्थितीवर मात करीत तनिशाने मिळविले यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola SSC student result

अकोला : परिस्थितीवर मात करीत तनिशाने मिळविले यश

अकोला : घरची परिस्थिती बेताची. वडील गवंडी काम करणारे. कोरोना काळात पित्याचे छत्र हरविले. दहावीचे वर्ष असल्याने फार खचून केलेल्या मुलीला आईने परिश्रम करीत आत्मविश्वास दिला. आज दहावीच्या निकालात त्यात तनिशा नंदू गंगाधरेने जिद्द व परिश्रमाच्या बळावर ८५.६० टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले.

लेबर काॅलनीत नंदू गंगाधरे यांचे कुटुंब राहते. नंदू हे गवंडी काम करायचे. गतवर्षी काेरानाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाचा भार पत्नी पद्मावर आला. मुलगी तनीशाचे दहावीचे वर्ष आणि पतीचे निधन अशा परिस्थितीत अडकल्यानंतरही पद्मा यांनी मुलगी तनीशाला त्याची जाणीव होऊ दिली नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहित केले.

शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि तनिशाने वडिलांच्या स्वप्न पूर्तीसोबतच आईच्या परिश्रमाला फळ मिळवून दिल्याची गोड बातमी कानावर पडली. तेव्हा गंधाधरे कुटुंबियांचा आनंद गगणात मावेनाशा झाला. मुलीच्या शिक्षणासाठी कुठेही कमी पडू नये म्हणून पद्मा यांनी साड्यांना पिकाे-फाॅल लावने, पतंग विक्री यासारखे व्यवसाय केले. त्यातून मिळालेल्या चार पैसांसोबतच अडचणीला भावाची मदत मिळाली. तनिशाने दहावीचा निकाल लागल्यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूमध्ये शिक्षकांनी तिचे कौतुक केले.

तनिशाचा डॉक्टर होण्याचा निर्धार

तनीशा गंगाधरेने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल बोलताना म्हणाली की, हे यश मिळेल याचा आत्मविश्वास होता. परिस्थितीपुढे गुडघे न टेकता यापुढेही लढून डॉक्टर होण्याची इच्छा तिने बोलून दाखविली. तनिशासारख्या महत्त्वाकांक्षी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी तिच्या शिक्षक व पालकांनी तिला शुभेच्छा दिल्यात.

Web Title: Akola Ssc Student Result Tanisha Passed 10th Paper Struggle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top