esakal | कृषी मंत्र्यांचे स्ट्रिंग ऑपरेशन म्हणजे खात्यावर नियंत्रण नसल्याची कबुलीच -वंचित बहुजन आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

akola string operation of the agriculture minister is a confession-deprived Bahujan front that lacks control over the account

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथील एका बियाणांच्या दुकानावर स्वतः मारलेल्या धाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दादा भुसे यांनी मारलेली धाड कृषी खात्यावर त्यांचे नियंत्रण नसल्याचा कबुलीजबाब असून राज्यातील शेतकरी हवालदिल असताना राज्याचे कृषी खाते पदाची जाणीव नसलेल्या मंत्र्याचे ताब्यात असल्याचे सिद्ध झालाचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

कृषी मंत्र्यांचे स्ट्रिंग ऑपरेशन म्हणजे खात्यावर नियंत्रण नसल्याची कबुलीच -वंचित बहुजन आघाडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथील एका बियाणांच्या दुकानावर स्वतः मारलेल्या धाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दादा भुसे यांनी मारलेली धाड कृषी खात्यावर त्यांचे नियंत्रण नसल्याचा कबुलीजबाब असून राज्यातील शेतकरी हवालदिल असताना राज्याचे कृषी खाते पदाची जाणीव नसलेल्या मंत्र्याचे ताब्यात असल्याचे सिद्ध झालाचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.


युरिया हा खत मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी भुसे यांच्याकडे प्राप्त झाल्या नंतर औरंगाबाद येथे दादा भुसे यांनी धाड टाकली.नवभारत फर्टीलायझर नावाच्या एका दुकानात दुकानाच्या गोडाऊनचा पंचनाम्यात १३८६ पिशव्या युरियाच्या आढळल्या.युरिया आढळल्यानंतर दुकानावर कारवाई करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत.याव्यतिरिक्त राज्याच्या कृषिमंत्र्यांनी इतर दुकानदाराना देखील इशारा दिला आहे.अश्या बातम्या वाचून शेतक-या मध्ये चीड निर्माण होत आहे.शेतक-यांना मुबलक बी बियाणे खते मिळत नाही.कर्जमाफीचा लाभ नाही.पीकविमा अधांतरी आहे.आणि अनेक शेतक-यांनी मोठ्या मेहनतीने पेरलेले बियाणे अनेक जिल्ह्यात उगवलेच नाही.अशी भीषण परिस्थिती असताना कृषी मंत्री मात्र नुसते हवाई इशारे देण्यात व्यस्त आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शवभूमीवर कृषी सेवा केंद्रावर गर्दी करणे नका,शासनाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन खते व बियाणे ह्यांची मागणी नोंदवा. घरपोच रास्त दरात पुरवठा करण्याचे आश्वासन सरकरणे दिले होते.राज्यात बियाण्यांचा तुटवडा नसून, विशीष्ट कंपनीचेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात सोयाबीनसह कुठलेही खते आणि बियाणे कमी पडू दिले जाणार नाही.राज्यात युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे. असा दावा कृषीमंत्री दादाजी भुसे ह्यांनी केला होता. कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.हे देखील त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांचा हा दावा बोलाचीच कढी ठरला आहे.

महाराष्ट्र ह्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून आपली जबाबदारी काय असते कदाचित हेच त्यांना कुणी सांगितलेले दिसत नाही.खरीप हंगामाचे नियोजन आणि खते व बियाणे ह्याची उपलब्धता ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री नंतर कॅबिनेट मिनिस्टर हा त्याला दिलेल्या खात्याचा प्रमुख असतो काय आणि संबधीत खात्याचे सर्व निर्णय घेण्याची त्यांना मुभा असते. हे करण्याचे सोडून थातुर मातुर कार्यवाही वर पाठ थोपटून घेण्याची घाई कृषी मंत्र्यानी केली आहे.हे पोरखेळ सोडून कृषी मंत्री म्हणून शेतक-यांना न्याय देण्यासाठी कामाला लागावे व काळा बाजार करणऱ्या दुकानदारांवर साठेबाजी नियंत्रण कायद्या नुसार कठोर कार्यवाही करण्याची तसेच मुबलक बियाणे व खते शेतकऱ्यांना बांधावर तर दिली नाही ती दुकानदारांकडे रास्त भावात मिळावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.