पोलिस अधीक्षकांकडून रात्री संचारबंदीची निगराणी! | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस अधीक्षकांकडून रात्री संचारबंदीची निगराणी

अकोला : पोलिस अधीक्षकांकडून रात्री संचारबंदीची निगराणी!

अकोला : त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटल्यानंतर अकोल्यात संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी होते किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर स्वतः बुलेट गाडीने मध्यरात्रीनंतर फिरले. पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना देत महत्त्वाच्या कामाने बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिली. अकोला शहरातील काही भागात तणाव निर्माण झाल्याने व अफवा पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याने जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतला आहे. रविवार, ता. १९ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

पोलिस प्रशासनाच्या वतीने या संचारबंदी व जमाव बंदीची अंमलबजावणी होते की नाही याची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाहणी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनचा परिसर, महत्त्वाचे चौक, रस्त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी केली. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वतः बुलेट चालवत अधीक्षकांनी पोलिस बंदोबस्ताची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केले आहे.

हेही वाचा: भंडारा : भाऊबीजेची ओवाळणी करून येताना अपघाती दोघांचा मृत्यू

पोलिसांना सहकार्य करा!

शहरात सायंकाळी सात वाजतापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी रविवारी सकाळी ६ पर्यंत राहणार आहे. या काळात नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी संचारबंदीचे गांभीर्याने पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना पोलीस प्रशासनाने केले आहे.

कुठे बळाचा वापर, तर कुठे शिथिलता!

पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही संचारबंदीचे पालन न केल्याने पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य बळाचा वापर केला आहे. पोलिसांनी नियमात सक्ती केल्याने सायंकाळी ७ वाजेनंतर रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला आहे. गस्तीवर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याने पोलिसांच्या बळाचा सामना करण्याची वेळ आली होती. काही ठिकाणी पोलिस बळाचा वापर करीत असले तरी शहरातील संंवेदनशिल नसलेल्या भागात संचारबंदी काळतही नागरिक बाहेर फिरताना दिसत होते.

loading image
go to top