मोटारसायकल नाल्यात पडल्याने दोन तरुणांचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा : मोटारसायकल  नाल्यात पडल्याने दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

भंडारा : मोटारसायकल नाल्यात पडल्याने दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

लाखनी (जि. भंडारा) : दिवाळी संपताच सुरू होते बहीण भावाचा सन म्हणजेच भाऊबीज परंतु बहिणीकडून भाऊबिजेची ओवाळणी करून गावी परत येत असताना मोटारसायकल नाल्यात पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यात घडली आहे.

हेही वाचा: सहा राज्यांमध्ये बंद पाळण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील राकेश केवळराम देशमुख (२८) आणि महेश जगदीश कामथे (३२) दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) हे दोघे साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे महेशच्या बहिणीच्या घरी शुक्रवारी गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी करुन रात्री मोटरसायकलने भुगावमार्गे गावी परत येत होते. मात्र ते घरी परतले नाही त्यामुळे घरच्यांनी शोधा शोध केली असता शनिवारी सकाळी हे दोघेही नांहोरि जवळील नाल्यात पडलेले दिसले. रात्रभर दोघेही नाल्यात पडून राहिल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करत आहेत.

loading image
go to top