
अकोला : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन
अकोला : जिल्ह्यातील ३१ तलाठ्यांची एक वेतनवाढ रोखल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गौण खनिज संबंधी कामांवर पूर्णतः बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांची कामे व ऑनलाईनची कामे मात्र तलाठ्यामार्फत सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात वाळू माफिये सक्रिय असून, रेतीची तस्कारी करून शासनाचा महसूल तर बुडताेच नागरिकांनी जादा दराने रेती विकत घ्यावी लागते. त्यामुळे अवैध गौण खनीन वाहतूक राेखण्यासाठी घालण्यासाठी प्रशासनाकडून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तालुका पातळीवर स्थायी व भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र नियुक्त तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांची जिल्हा प्रशासनाकडून पूर्तता झालेली नाही.
उटल महाखनिज ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन न केल्याने ता. २ मे रोजी जिल्ह्यातील चार मंडळ अधिकारऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ता. ५ मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाच मंडळ अधिकारी व २६ तलाठ्यांवर कार्यवाही केली. उपराेक्त कार्यवाहीचा निषेध करण्यासाठी विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा अकोला व विदर्भ मंडळ अधिकारी संघ जिल्हातर्फे आंदाेलन करण्यात येत आहे.
Web Title: Akola Talathi Mandal Officials Movement For Salary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..