
अकाेला : सतरा लाखांची लुट, चार आरोपी जेरबंद
वाशीम : येथील चंद्रकांत शौकीराम जिवनानी यांची १७ लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ३६ तासात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिवनानी दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख रुपये व बिडी कलेक्शनचे १५ लाख रुपये असे एकूण १७ लाख रुपये घेउन स्कुटीवरुन घरी परत जात असताना अनोळखी इसमाने गाडीला धक्का देऊन त्यांना खाली पाडले व लाथाबुक्यांनी मारहाण करुन १७ लाख रुपये असलेली थैली घेऊन पळून गेला, जिवनानी यांच्या फिर्यादीवरुन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यासंदर्भात अनुपम मदन चिंचाबेकर (वय २३ वर्षे रा एसएमसी मागे लाखाळा वाशीम) यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या साथीदारांच्या माहितीनुसार बादशाह उर्फ अजय शिवराम राऊत (वय २१ वर्षे रा काकडदाती ता जि वाशीम ) अरुण भारत खडसे (वय २३ वर्षे रा जांभरुण नावजी, ता जि वाशीम), आकाश आत्माराम चोपडे (वय २२ वर्षे रा येवता ता रिसोड हमु काळे फाईल वाशीम) यांना अटक करण्यात आली.
नमुद आरोपीतकडुन ६,५०,०००/- नगदी व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किंमत ७०,०००/- ४ मोबाईल ३५०००/-असा एकुण ७,५५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळला असता त्यांचे नावे यापुर्वी गुन्हे नोंद असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच त्यांचेवर आणखी काही गुन्हे वाशीम जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात दाखल आहेत का यांची खात्री करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर कारवाई मा. पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलिस अधीक्षक भामरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, सोमनाथ जाधव, सपोनि अतुल मोहनकर, पोहेकॉ सुनिल पवार, संतोष कंकाळ,राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रशांत राजगुरु, राजेश गिरी, प्रविण राउत, अश्विन जाधव, गजानन गोटे, निलेश इंगळे, डिगांबर मोरे, अविनाश वाढे, शुभम चौधरी प्रशांत चौधरी,गोपाल चौधरी यांनी केली आहे.