Akola: तीन जिल्ह्यातील ८२२ लोकप्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

अकोला : तीन जिल्ह्यातील ८२२ लोकप्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारसंघात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे सर्व मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य व पदाधिकारी आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच उमेदवारांकडून मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

यासंदर्भात निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात सर्वाधिक ३६७ मतदार बुलडाणा जिल्ह्यातील आहे. अकोला जिल्ह्यात २८७ मतदार असून, वाशीम जिल्ह्यात १६८ मतदार आहेत. एकूण मतदार संघात ३८५ पुरुष तर ४३७ स्त्री मतदार मिळून ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यापूर्वी जाहीर केलेल्या यादीत ८२१ मतदार होते. अंतिम मतदार यादीत एका मतदाराची वाढ झाली आहे. या मतदार संघासाठी भाजपच्या वतीने वसंत खंडेलवाल तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

असे आहेत जिल्हानिहाय्य मतदार

अकोला जिल्हाः- जिल्हा परिषद अकोला-६० मतदार, अकोला महानगरपालिका- ८१ मतदार, अकोट नगरपरिषद-३६, तेल्हारा नगरपरिषद-१९, बाळापूर नगरपरिषद- २६, पातूर नगरपरिषद-१९, मुर्तिजापुर नगरपरिषद-२६, बार्शी टाकळी नगरपंचायत- २०, (एकूण मतदार-२८७)

वाशीम जिल्हाः वाशीम जिल्हा परिषद-५८, नगर परिषद वाशिम-३४, नगर परिषद कारंजा-३२, नगर परिषद मंगरुळपीर-२१, नगर परिषद रिसोड-२३,(एकूण मतदार-१६८)

बुलडाणा जिल्हाः जिल्हा परिषद बुलडाणा-७१, नगरपरिषद बुलडाणा-३१, नगर परिषद चिखली-३०, नगर परिषद देऊळगाव राजा-२१, नगर परिषद सिंदखेड-१९, नगर परिषद लोणार-२०, नगर परिषद मेहकर-२७, नगर परिषद खामगाव-३७, नगर परिषद शेगाव-३२, नगर परिषद जळगाव जामोद-२१, नगर परिषद नांदुरा-२६, नगर परिषद मलकापूर-३२ (एकूण मतदार- ३६७).

loading image
go to top