
अकोला-तिरुपती रेल्वेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला या रेल्वे गाडीला पुढील महिने म्हणजे ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बालाजीला जाणाऱ्या भाविकांसाठी सुविधा झाली आहे.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागामध्ये येणाऱ्या व अकोला रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अकोला-तिरुपती-अकोला यागाडीसह पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना ता. १ एप्रिल ते ता. २ ऑगस्ट दरम्यान मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील हजारो भाविक बालाजीचे दर्शनासाठी तिरूपती येथे जातात.
अकोल्यातून थेट तिरुपतीसाठी गाडी सुरू झाल्याने त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात एकीकडे गाड्या बंद असताना दक्षिण मध्य रेल्वे सुरू केलेल्या या गाडीमुळे भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी सुविधा मिळाली होती. आता भाविकांच्या मागणीनुसार या गाडीला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ०७६०५ तिरुपती-अकोला (शुक्रवार) या साप्ताहिकगाडीची तिरुपती येथून सुटण्याची वेळ १२.३० असून, अकोला येथे पोहोचण्याची वेळ १२.१५ आहे. या गाडीला एप्रिल ते २७ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याशिवाय रविवारी अकोला येथून सुटणारी ०७६०६ या क्रमांकाची अकोला–तिरुपती ही साप्ताहिक ८.२० ला अकोला येथून सुटेल व तिरुपती येथे ६.२५ ला पोहोचेल. या गाडीला ता. ३ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
डॉ.आंबेडकरनगर गाडीची एक फेरी रद्द
रेल्वे मार्ग दुहेरीकरणाकरिता नॉन-इंटर लॉक वर्किंगमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांवर परिणाम झाला आहे. त्यात यशवंतपूर- डॉ. आंबेडकर नगर-यशवंतपूर गाडीची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. १९३०१ क्रमांकाची डॉ आंबेडकर नगर- यशवंतपूर एक्स्प्रेस ता. २७ मार्च रोजी धावणार नाही परतीच्या मार्गातील ता. २९ मार्चची गाडीही रद्द करण्यात आली आहे.
Web Title: Akola Tirupati Railway Extension Till August
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..