Akola : तंबाखुमुक्त शाळा परिसराची पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखुमुक्त

Akola : तंबाखुमुक्त शाळा परिसराची पोलखोल

अकोला : शाळा-महाविद्यालयाचे परिसर तंबाखुमुक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन आदेशही काढण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तशाच सूचनाही लावण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने शाळा-महाविद्यालयासह रुग्णालय परिसरातही जिल्हाभर तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असून, प्रतिबंधित गुटखाही विक्री केला जात असल्याचे पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईतून उघड झाले.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शाळा महाविद्यालय व शासकीय रुग्णालय परिसरात होत असलेल्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई केली. शासकीय रुग्णलय परिसरासमोर व मुंगीलाल बाजोरिया विद्यालयापुढे प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ सिगारेट, पान, तपकीर व प्रतिबंधित गुटखा विक्री सुरू होती.

याबाबत मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाने सोमवारी सकाळी ११ वाजता दोन पंचासमक्ष छापा मारला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील पानटपरीवर चक्क १० बॉटल देशी दारू तसेच प्रतिबंधित गुटखाही आढळून आला. येथे एकूण १६ हजार रुपायंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सतीष रमेश मिश्रा (रा. आनिकट), कृष्णा शांताराम करपे (रा. बार्शीटाकळी), सौरभ राजेंद्र वर्मा (रा. पोस्ट ऑफिसमागे), दिलीप शामराव अघडते (रा. रिधोरा) या आरोपीवर कारवाई करण्यात आली. या सर्व अरोपींवर सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकातील विनोद तूरकर, अमित दुबे, अविनाश पाचपोर, महिंदर मालिये यांनी केली.

जीएमसीपुढे सुरू होती अवैध दारू विक्री

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापुढील पान टपरीवर पोलिसांनी कारवाई केली तेव्हा तेथे अवैध देशी दारुच्या बॉटलही आढळून आल्यात. पान टपरीवर १० बॉटल विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्या होत्या, हे उघड झाले. यावरून जीएमसीपुढे अवैध दारू विक्रीही होत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, जवळच शाळाही असल्याने शाळा व महाविद्यालय परिसर तंबाखुमुक्त तर दूरच मद्यविक्रीपासूनही दूर राहिले नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.

Web Title: Akola Tobacco Free School Premises

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..