Akola : अतिपावसाने टोमॅटोचा हंगाम लवकर आटोपला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola news

Akola : अतिपावसाने टोमॅटोचा हंगाम लवकर आटोपला

दानापूर : राज्यात झालेल्या जोरदार पावसाने टोमॅटो हंगामावर परिणाम झाला असून, खरिपात लागवड केलेल्या टोमॅटोचे उत्पादन घटले आहे.यंदा झालेल्या सततच्या पावसाने टोमॅटोचा हंगाम २० ते २५ दिवस अगोदरच आटोपल्याचे चित्र दानापूर परिसरात पाहायला मिळाले, त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा: Akola : विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवणारे बहुतांश शिक्षकच व्यसनाधीन!

सोबतच जे पीक अस्तित्वात होते त्यावर आलेल्या रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात टोमॅटो व भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. टोमॅटो पिकाची लागवड खरिपातील जूनमध्ये केली जाते.

हेही वाचा: Akola : विमा कंपनीने पुसली तोंडाला पाने

मात्र यंदा जोरदार झालेल्या पावसाने टोमॅटोसह भाजीपाला पिकावर मोठ्या प्रमाणावर रोग आल्याने बाजारातील आवक घटल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दानापूरसह हिवरखेड, सोगोडा परिसरात गेल्या दोन, तीन वर्षांपासून टोमॅटो पिकांवर करपा, बुरशीजन्य, रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Akola : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल बनला

त्यातून सावरत शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; मात्र सतत झालेल्या पावसाने लागवडी पासूनच टोमॅटो उत्पादनाला फटका बसला.सतत झालेल्या पावसाने टोमॅटो पीक नेस्तनाभूत झाले. टोमॅटोला लागलेले फूल गळती मोठ्या प्रमाणावर झाल्याने फळ धारनेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.

- योगेश येऊल, टोमॅटो उत्पादक, दानापूर.