Akola : दहा महिन्यात एक लाखावर वाहनांकडून नियमभंग

एक कोटीवर दंड वसुली; शहर वाहतूक शाखेची कामगिरी
Akola action against traffic rules break
Akola action against traffic rules breaksakal

अकोला : शहरात १ जानेवारी ते २४ ऑक्टोबर या दहा महिन्यात एक लाख दोन हजार २७६ वाहनांकडून वाहतूक नियमांचा भंग झाला. त्यामुळे या वाहन चालक-मालकांकडून एक कोटी तीन ला ६५ हजार ७४० रुपये दंड शहर वाहतूक नियंत्रण शाखे मार्फत वसुल करून शासन जमा करण्यात आला आहे.

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत अवैद्य प्रवासी वाहतुक कलम ६६/१९२ अंतर्गत एकूण ३९८ केसेस करून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणाऱ्यांविरुद्ध एकूण ७६५ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. सिंग्नल तोडून वाहतूक करणे २३९/१७७ अंतर्गत ३६ हजार ३८१ केसेस, भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या पाच हजार १११ केसेस, लायसन्स सोबत न बाळगणाऱ्या २४ हजार ३६८ केसेस, विना सिटबेल्ट अंतर्गत १० हजार ५५४ केसेस करून १३ लाख ५० हजार २०० दंड वसुल करण्यात आला आहे.

ट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध चार हजार १३१ केसेस, नो पार्कींगमध्ये वाहने उभे करणाऱ्यांविरुद्ध तीन हजार १५५ केसेस दाखल करण्यात आल्यात. विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरचा वापर करून शहरात ध्वनी प्रदुषनात वाढ करणाऱ्या १५२ बुलेट चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एकूण ३२ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून सबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अपघात टाळण्यासाठी याकडे द्या लक्ष

  •  रस्ते वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करूनच वाहन चालवावे.

  •  मद्य प्राशन करून वाहन चालवू नये.

  •  रस्त्यावर अतीवेगाने वाहन चालवू नये

  •  दुचाकीवर ट्रीपल सीट चालवू नये

  •  हेल्मेटचा वापर करावा

  •  कोणतेही वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करून नये

  •  वाहन चालविताना वाहनाची कागदपत्रे व लायसन्स सोबत बाळगावे

१२ हजारांवर ऑटोवर लावले सुरक्षा स्ट्रिकर

प्रवासी व महिला सुरक्षेबाबत विशेष मोहीम अंतर्गत शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोलाद्वारे सूचना फलक/स्टिकर्स तयार करून शहरातील एकूण १२ हजार ८९२ ऑटोवर सदर स्टिकर्स लावण्यात आले आहेत. चालू वर्षात नागरीकांकडून हरविलेले मौलवान वस्तु, हरविलेले वाहन, मोबाईल, बॅग व इतर महत्त्वाचे २२ साहित्य किंमत अंदाजे सात लाख २५ हजारांचा मुद्देमाल शहर वाहतूक शाखेच्या अमंलदारांकडून त्यांच्या मुळ मालकास परत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com