अकोला : MIDCपरिसरातील दोन गुंड हद्दपार

गुन्हेगारांवर वचक बसविण्याचा प्रयत्न
Crime
CrimeSakal

अकोला: टोळीने गुन्हा करणारे एमआयडीसी पोलिस स्टेसनच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांनादोन वर्षांकरिता अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश मंगळवार, ता. २४ मे रोजी पोलिस अधीक्षकांनी दिला. गुन्हेगार अजय शभू निगम (२५) व दिनेश शिवशंकर उपाध्ये (२७) दोघेही राहणार ढोणे कॉलनी शिवणी या दोघांवरील गुन्ह्याची मालिका बघता यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला जुमानत नसल्याने दोघांविरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनयमाप्रमाणे अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी मंगळवारी हद्दपारीचा आदेश दिला.

आतापर्यंत ३७३ गुन्हेगार तडीपार

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एमपीडीए ॲक्ट अन्वये एकूण ६६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल. कलम ५५ म.पो. अधिनयमाप्रमाणे एकूण १३३ गुन्हेगारी टोळ्यांतील ३२१ गुन्हेगारांवर तर कलम ५६ नुसार ५२ गुन्हेगार असे एकूण ३७३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com