अकोला : दोन देशी कट्टासह जिवंत काडतुसे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : दोन देशी कट्टासह जिवंत काडतुसे जप्त

अकोला : दोन देशी कट्टासह जिवंत काडतुसे जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चिखली रेल्वे गेट जवळ विनापरवाना देशी कट्टा वापरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तर तेलारा येथे एका आरोपीच्या राहत्या घरातून देशी कट्टा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुर्तीजापुर शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुर्तीजापुर शहरातील चिखली रेल्वेगेट जवळील मुजीब भंगरावाल्याचे दुकानाजवळ आरोपी आशीष अरविंद घणबहादुर रा. खरप रोड मुर्तीजापुर हा दहशत निर्माण करत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा देशी कट्टा, एक जिवंत काडतुस असा एकुण 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला करून मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला कलम ३/२५ आर्म अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सपोनि नितीन चव्हाण, सपोउपनि गोपीलाल मावळे, राजपालसिंग ठाकुर, गणेश पांडे , संतोष गवई, संदीप काटकर, फिरोज खान, विजय यादव, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, उदय शुक्ला, पवन यादव, सतीष गुप्ता, खंडारे, प्रवीण कश्यप यांनी केली.

तर तेल्हारा येथील संतोष रमेश ढाळे वय 29 वर्ष रा. इंदीरा नगर तेल्हारा ता. तेल्हारा याच्या राहत्या घरातुन 25 हजार किंमतीचे एक लोखंडी धातुचा देशी कटटा पिस्टल, अग्नीशस्त्र जप्त केले. पोलिसांनी आरोपीला अटक करून तेल्हारा पोलीस स्टेशनला ३, २५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, गणेश सोळंके, अनिल सिरसाट, जयेश शिनगारे, निकेश सोळंके आदींनी केली.

loading image
go to top