बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा विक्रम |India vs Pakistan T20 World Cup Match167 Million viewers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK
बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs Pakistan T20 World Cup Match167 Million viewers Record टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित झालाय. या दोन्ही देशांतील सामना नेहमीच चर्चचा विषय असतो. भारत-पाक सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. टेलिव्हिजनवर 167 मिलियन लोकांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्याचा आनंद घेतला आहे.

आयसीसीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील हा विक्रमी टप्पा आहे. पाच वर्षानंतर झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद हे भारताकडे होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्यात आली होती. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या स्पर्धेचे जवळपास 10,000 तास लाइव्ह कव्हरेज दाखवण्यात आले. जगभरातील दोनशे देशांत सामने पाहिले गेले. यात भारत-पाकिस्तान सामन्याने नवा विक्रम रचला.

हेही वाचा: Champions League : पराभवानंतरही PSG संघ पुढल्या फेरीत

भारत-पाक यांच्यातील लढतीनंतर काही दिवसांतच या स्पर्धेचे मालकी हक्क असलेल्या ब्रॉडकास्टर्सकडून हा सामना 167 मिलियन लोकांनी पाहिल्याचा दावा केला होता. स्पर्धेच्या गव्हर्निंग बॉडीने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला. याआधी 2016 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील सेमी फायनलची लढत सर्वात पाहिली गेली होती. हा विक्रम ब्रेक करत युएईत नव्या विक्रमाची नोंद झाली.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आकर्षण जगभरात मोठ्या प्रमाणात दिसून आले. जागतिक स्तरावर मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे, असे आयसीसीचे सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी viewership आकड्यासंदर्भात म्हटले आहे. क्रिकेटचा विस्तार होण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे. जगभरातील बहुतांश चाहते या खेळाशी जोडले गेले आहेत. अनेक मुले यामुळे प्रेरित होतात, असा उल्लेखही आयसीसीच्या निवेदनात करण्यात आला आहे.

loading image
go to top