

MLA Sajid Khan submitting a detailed memorandum to the Akola Municipal Commissioner,
Sakal
श्रीकांत राऊत
अकोला : महानगरपालिकेच्या प्रभाग रचना आणि प्राथमिक मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार साजिदखान पठाण यांनी निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे विस्तृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे प्रभागांत हजारो मतदारांना चुकीच्या प्रभागात हलवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार पठाण यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागामध्ये कोणताही भौगोलिक बदल करण्यात आलेला नव्हता.