esakal | अंगठ्याचा ठसा घेवून बॅंक खात्यातून दीड लाखाची अफरातफर
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola Washim Crime News Rs 1.5 lakh embezzled from bank account

मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील यशोदा लक्ष्मण रवने येथील उपसरपंच आहेत. यांची मिनी बॅंकेत बोटाचे ठसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार मालेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे. कापूस विकून भारतीय कपास निगम लि. फार्मेसी यांच्याकडून ता.२५ जानेवारी एक लाख ५४ हजार ८६१ रूपये यांच्या बँक खात्यात जमा झाले होते.

अंगठ्याचा ठसा घेवून बॅंक खात्यातून दीड लाखाची अफरातफर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेडशी (जि.वाशीम)  ः मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील यशोदा लक्ष्मण रवने येथील उपसरपंच आहेत. यांची मिनी बॅंकेत बोटाचे ठसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार मालेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे. कापूस विकून भारतीय कपास निगम लि. फार्मेसी यांच्याकडून ता.२५ जानेवारी एक लाख ५४ हजार ८६१ रूपये यांच्या बँक खात्यात जमा झाले होते.


गत आठवड्यात ता.१८ रोजी काही कामासाठी बँक खात्यातून पैसे काठायचे होते म्हणून गावातील मिनी सेंट्रल बँक शाखेकडे गेले असता मिनी बँकेचे कर्मचाऱ्यांकडून ५७ हजार रूपये काढायचे सांगितले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी यशोदाबाई रवन यांच्या आगंठे बरेच वेळा घेतले. परत-परत अंगठा घेतल्यावर कर्मचाऱ्यांनी ५७ हजार रूपये दिले.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

यशोदाबाई पैसे घरी घेऊन आल्या. शनिवारी (ता.२०) पुन्हा पैसे काढण्यासाठी गावातील त्याच मिनी बँकेत आल्या. मला काम आहे, मला मिटिंगला जायायचे आहे. संध्याकाळी परत आल्यावर पैसे काढू, असे म्हणून बँकेतला कर्मचारी तेथून निघूण गेला.

यशोदाबाईंना महत्त्वाचे काम असल्याने गावातील पोस्ट ऑफिसमध्ये गेले आसता, त्याच्या खात्यात फक्त एक हजार ४७५ रूपयेच शिल्लक असल्याचे सांगण्यात आल्याने, त्यांना धक्काच बसला. पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांवर विश्‍वास बसत नसल्याने, मालेगाव गाठून सेंट्रल बँकेच्या शाखेत परत एकदा चौकशी केली असता, ता.१८ फेब्रुवारी रोजी अंगठ्याच्या ठस्याने १६ वेळा एक लाख ५६ हजार रूपये राजुरा येथील मिनी बँक मधून पैसे काढले असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

आपली फसवणूक झाल्याचे वाटल्यानंतर गावात परत येउन संध्याकाळी मिनी बँकेचे कर्मचाऱ्यांना या बद्दल विचारले असता, उडवा-उडवीची उत्तर देण्यात आले. आपली फसवणूक झाल्यामुळे यशोदाबाई चा मुलगा विष्णू रवने यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!