अकोला जिल्हा बँक गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola-Washim District Central Cooperative Bank Award for Completion of 100 Years of Successful Service Amit shaha

अकोला जिल्हा बँक गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

अकोला - गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमीत शहा यांनी नवी दिल्ली येथे १२ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामीण सहकारी बँकेचे राष्ट्रीय संमेलनात संबोधित करताना सहकारी संस्था अधिक सक्षम होणे ही काळाजी गरज आहे. शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सहकारी बँक यशस्वीपणे कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन केले. तद्वतच अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशस्वी सेवेची १०० वर्षे पूर्ण केल्याबाबतचा पुरस्कार अमीत शहा यांच्याहस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी स्वीकारला.

बँकेस मिळालेला सन्मान हा सर्व सामान्य शेतकरी, कष्टकरी, बँकेचे ग्राहक व हितचिंतक यांचा बँकेवरील अतूट विश्‍वासाचे प्रतीक असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेस मिळालेल्या सन्मानाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

या राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय सहकार राज्यमंत्री बा.एल. वर्मा, एनसीयुआय, ईफको तसेच नॅस्कॉबचे अध्यक्ष व सचिव भारत सरकार, नाबार्ड व इतर सहकारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, निती आयोगाचे अधिकारी तसेच भारतातील सर्व राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी कृषी सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Akola Washim District Central Cooperative Bank Award For Completion Of 100 Years Of Successful Service Amit Shah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..