सर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना  गवळी  आणि  कारंजा  मतदार  संघाचे भाजपचे  आमदार राजेंद्र पाटणी  यांच्या  मधील राजकीय वैर तसं जूनेच.  

वाशीम  : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना  गवळी  आणि  कारंजा  मतदार  संघाचे भाजपचे  आमदार राजेंद्र पाटणी  यांच्या  मधील राजकीय वैर तसं जूनेच.  

मात्र ,वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे आज (ता.26)  जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी  या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित  राहणार होते.  त्यापूर्वी  विकास कामात अडथला  निर्माण करून  शिवसेनेने  आणलेल्या  विकास  कामाला  बाधा  निर्माण का करता  म्हणत,  खासदार  भावना  गवळी आणि आमदार राजेंद्र  पाटणी  आमने सामने  आले  आणि  तू तू मै मै झाली.

हेही वाचा -ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

या दरम्यान  शिविगाळ झाली.  तर शिवसेनेच्या   कार्यकर्ते  आमदार पाटणी  यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला.  आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची  तक्रार दाखल केली.  

 आता दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदामध्ये आमदार पाटणी यांनी विकास कामे अडविले नसल्याचा दावा केला तर, विकास कामांमध्ये अडथळा आणला तर जनतेसाठी अडवणुकीचा समाचार घेणे ही आमची संस्कृती असल्याचा दावा खासदार गवळी यांनी केला आहे.

हेही वाचा -प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप

वाशीम-यवतमाळ च्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित होते. मात्र, या बैठकीपूर्वी विकास कामात अडथला निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता? म्हणत खा. भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने सामने आले आणि, तू-तू-मै-मै झाली.

हेही वाचा -खरं सांगा दीप सिद्धू तुमचा कोण लागतो? आमदार अमोल मिटकरींचा आशिष शेलारांना सवाल

यावेळी उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात काही शहरांमध्ये तणाव निर्माण झाला असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. यानंतर आज आमदार पाटणी यांनी पत्रकार परीषद घेवून खा. गवळी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. खासदार भावना गवळी यांनीही विकासकामात अडथळा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

सर्वसामान्य जनतेशी बांधीलकी म्हणून आम्ही सरकार सोबत भांडून जिल्ह्यासाठी विकासकामे आणायची, आणि स्वतःच्या हितसंबंधापोटी कारण नसतांना आमदारांनी विरोध करून त्यात अडथळे आणायचे. अशामुळे आम्ही जनतेची कामे कशी करणार? यावर आम्ही प्रश्न विचारला तर, काय चुकीचं केलं असा सवाल खासदार भावना गवळी यांनी केला. आमदार पाटणी यांच्याशी झालेल्या वादानंतर खा. गवळी पत्रकारांशी बोलत होत्या.

हेही वाचा - आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही कुणालाही रस्त्यावर जाब विचारणार ही स्व. बाळासाहेबांची शिकवण असुन शिवसेनेची स्टाईल आहे. असे सांगून खासदार गवळी म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्रात गुंठेवारी नियमीत व खरेदी प्रक्रिया सुरू असताना केवळ वाशीम जिल्ह्यात गुंठेवारीचा प्रश्न कायम आहे. गरीबांना निवाऱ्याचा प्रश्न भेडसावत असतांना स्वतःच्या ले-आऊटमध्ये शासकीय निधीमधून भौतीक सुविधा देत शासकीय निधीचा गैरवापर करतांना यांना कुठलीही बांधीलकी नाही. या सर्व बेबंदशाहीची आपण मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे खासदार गवळी यांनी सांगीतले.

हेही वाचा - नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

आपण एक जागरूक लोकप्रतिनीधी या नात्याने आमदाराच्या मर्मावर बोट ठेवलं म्हणून हा राग काढल्याचे खासदार गवळी म्हणाल्या. आम्हाला संस्कृतीची भाषा शिकविणाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी बाजारपेठ बंद, जाळपोळ करून जनतेस वेठीस धरलं, तेंव्हा कुठे होती यांची संस्कृती, नियम व कायदा असा सवालही शेवटी खासदार गवळी यांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, महिला आघाडी प्रमुख मंगलाताई सरनाईक, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवि भांदुर्गे, शहराध्यक्ष गजानन ठेंगडे आदींची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim Marathi News Will not tolerate obstruction of common people MP Bhavana Gawali