esakal | लज्जास्पद प्रकार, कोरोना बाधित मृतदेहासाठी केली जाते पैशाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim news Money is demanded for corona infected corpses

 कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे शव पीपीई कीट मध्ये बांधण्यासाठी नातेवाईकांकडून चक्क पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोविड केअर सेंटर मधील या प्रकारानंतर प्रशासन सारवासारव करत असल्याचा आरोप होत असून, या प्रकाराने जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लज्जास्पद प्रकार, कोरोना बाधित मृतदेहासाठी केली जाते पैशाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे शव पीपीई कीट मध्ये बांधण्यासाठी नातेवाईकांकडून चक्क पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोविड केअर सेंटर मधील या प्रकारानंतर प्रशासन सारवासारव करत असल्याचा आरोप होत असून, या प्रकाराने जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यामधे कोरोना संसर्ग वाढत आहे. काही खासगी रुग्णालयात उपचाराला परवानगी देण्यात आली आहे. तर महिला रुग्णालयात शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये मेहकर तालुक्यातील उमरा येथील रुग्ण उपचार घेत होता. मात्र, उपचारा दरम्यान रविवार (ता.२८) च्या रात्री रुग्णाचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांना कळविल्यानंतर सोमवारी (ता.२९) नातेवाईक रुग्णालयात आले. मात्र, यावेळेस रुग्णालयात नातेवाईकांना मृतकाचे शव पीपीई कीट मध्ये बांधण्यासाठी आठशे रूपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती मृतकाचे नातेवाईक सुरेश येरमुले यांनी दिली. पैसे दिले नाहीत, तर शव बांधून दिले जाणार नसल्याचेही सबंधित व्यक्तीने नातेवाईकांना सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला गेला आहे. या गंभीर प्रकारावर रुग्णालय प्रशासन बोलण्यास तयार नसून, जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली आहे.

हेही वाचा-  पुढील तीन दिवस उष्णतेचे!, हवामान विभागाने दिला उष्णतेच्या लाटीचा इशारा
------------------------------
जिल्हा शल्य चिकित्सक नाॅट रिचेबल
या गंभीर प्रकारानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांना वारंवार भ्रमणध्वनी केला मात्र, नेहमीप्रमाणेच त्याचा भ्रमणध्वनी नाॅट रिचेबल लागत होता. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल त्यांनी घेतली की, नाही किंवा काय कारवाई केली? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
---------------------------
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज
या गंभीर प्रकारामधे मयताच्या नातेवाईकाला सरळ पैशाची मागणी केल्याचे काॅल रिकार्ड मयताच्या नातेवाईकाकडे आहे. हा प्रकार मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. एकीकडे नातेवाईक मृत झालेला असताना, पैसे मागण्याची निर्ढावलेली मानसिकता निषेधार्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालयात चाललेला हा गोरखधंदा बंद करणे आवश्यक आहे.

हेही वाचा-  शेतमाल विकून घरी निघालेल्या शेतकऱ्याला एक लाख रुपयांनी लुटले
----------------------------
पाच वाजेनंतर तपासणी नाही
शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये नियमावर बोट ठेवून काम केले जात असल्याचा आव आणला जातो. रिसोड येथील दोन आरोपीतांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनावली होती. या आरोपीस कारागृहात रवानगी करणे आवश्यक आहे मात्र, कारागृहात कोरोना चाचणी करूनच प्रवेश दिला जातो. रिसोड पोलिस ठाण्याचे दोन शिपाई आरोपींची चाचणी करण्यासाठी विनवत असताना मात्र, पाच वाजल्यानंतर चाचणी होणार नाही असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला. आता आरोपींना पोलिस कोठडीत ठेवता येत नाही, दुसरीकडे रुग्णालयात चाचणी केली जात नाही आणि चाचणी झाल्याशिवाय कारागृहात प्रवेश नाही, त्यामुळे करावे काय? हा प्रश्न शिपायांसमोर वृत्त लिहेस्तोवर कायम होता.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)

loading image