Akola: दगड, रिकाम्या पोत्यांनी जलवाहिन्या बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The water pipeline
दगड, रिकाम्या पोत्यांनी जलवाहिन्या बंद

अकोला : दगड, रिकाम्या पोत्यांनी जलवाहिन्या बंद

अकोला : महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्‍या निष्काळजीपणा फटका अकोल्यातील नागरिकांना नेहमीच बसला आहे. आता तर चक्क दगड, आणि रिकामे पोतेही जलवाहिन्यात अडकल्याने पाणीपुरवठाचा बंद होण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, नव्याने बांधलेल्या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करताना ही बाब उजेडात आल्याने जलवाहिनी दुरुस्ती करताना चांगलीच तारांबळ उडत आहे.

महापालिका हद्दीत अमृत योजनेतून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले. याशिवाय आठ जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. यापैकी सात जलकुंभाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या कामात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप विरोध पक्षांकडून सातत्याने होत आला आहे. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी तर याच विषयावरून सभागृहात सत्ताधारी व मनपा प्रशासनावर आरोपही केले होते.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

त्याची प्रचिती आता पाणी पुरवठ्याची चाचणी घेताना येत आहे. जलकुंभ बांधतानाच महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून आलेल्या ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून आलेले पाणी जलकुंभापर्यंत पोचवण्यासाठी ६०० ते ४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, कामातील निष्काळजीपणामुळे जलवाहिन्यांची तोंडे उघडीच ठेवण्यात आली. अनेक महिने या जलवाहिन्या तशाच पडून होत्या. त्यामुळे या जलवाहिनीत दगड-धोंडे, प्लॉस्टिकच्या वस्तु, चपला आदी वस्तू अडकल्यात. त्यामुळे जहवाहिनीच बंद पडली. पाणीपुरवठा सुरू करताना हीबाब लक्षात आल्याने आता नव्याने टाकलेल्या जलवाहिन्या दुरुस्ती करण्याची वेळ मनपा जलप्रदाय विभागावर आली आहे. दुसरीकडे अभियंते व कंत्राटदाराच्या डुलक्यांमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होणे अश्यक आहे.

भगतवाडी परिसरात दुरुस्तीची कामे भगतवाडी परिसरात अनेक गल्ल्यात जलवाहिनीमध्ये दगड, प्लॉस्टिकच्या पिशव्या आढळून आल्यात. त्यामुळेच या भागात अनेक ठिकाणी नव्याने टाकलेल्या जलवाहिन्या तोडून हा मलबा बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. केवळ जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नवीन जलवाहिनीच्या दुस्तीचा खर्च मनपा निधीतून अर्थात महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून गोळा करण्यात आलेल्या करातून करावा लागणार आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार अभियंते व कंत्राटदार यांच्यावर मनपा आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

loading image
go to top