

Akola Woman Scammed Using Fake Water Department Message
Sakal
अकोला : ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या घटनेत सायबर टोळीने शहरातील रत्नकला प्रल्हाद भगत यांची एक लाख ६६३ रुपयांनी फसवणूक केली आहे. ही फसवणूक खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, पीडित महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर गुन्हेगारांनी भगत यांना ९४३०९६७८४१ या क्रमांकावरून मेसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये अकोला महापालिकेचा लोगो लावून ‘मागील महिन्याचे पाणीकर बिल न भरल्यास पाईपलाईन तोडली जाईल,’ असा इशारा देण्यात आला होता. विश्वासार्हतेचा भास निर्माण करण्यासाठी "देवेश जोशी, पाणीपुरवठा पाईपलाईन अधिकारी" असे नाव आणि क्रमांकही नमूद करण्यात आला होता.