
अकोला : गेल्या आठवड्यात मॉन्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ४५ अंशावर गेलेला पारा अचानक ३२ अंशावर घसरला होता. मात्र, पावसाने ब्रेक घेताच पुन्हा तापमानाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता.२) ३७.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. शिवाय ६० टक्क्याच्यावर आर्द्रताही असल्याने गर्मी सुद्धा कायम आहे.