Akola News | वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Wine sales

अकाेला : वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या!

अकोला : महाराष्ट्र सरकारने वाईनची माॅल व किराणा दुकानात विक्री करण्याच्या घेतलेल्या निर्णायाच्या निषेधार्थ व हा निर्णय तातडीने रद्द करण्याचे मागणीसाठी अकोला येथे गांधी-जवाहर बागेत दारुमुक्ती आंदोलनचे वतीने लक्षवेधी धरणे देण्यात आले.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

दारुमुक्ती आंदोलनचे प्रमुख संयोजक भाई रजनीकांत यांनी एक दिवसाचा उपवास करून राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. सरपंच संघटना बाळापूरचे मंचितराव पोहरे यांच्या नेतृत्वात लक्षवेधी धरणे देण्यात आले. यावेळी रेखाताई वाकडे; सविताताई शेळके; महादेवराव भुईबार, महादेवराव हुरपुडे, आत्माराम शेळके, अशोक रामटेके, गोवर्धन खवले, बबनराव कारकिरड, वसंतराव केदार, प्रा.राजाभाऊ देशमुख, दिलीप साधवाणी, रोहित तारकस, गजानन गणवीर, शंकर सरप, शंकर तायडे, ठाकूरदास चौधरी, पुरुषोत्तम वसू, दर्पण खंडेलवाल आदी जिल्ह्यातील शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हा निर्णय रद्द होईपर्यंत लढा देण्याचे संयोजक भाई रजनीकांत यांनी समारोप प्रसंगी घोषित केले.

Web Title: Akola Wine Sales Reverse The Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top