Akola Crime News
esakal
अकोला येथे आंतरशालेय कुस्ती स्पर्धा दरम्यान धक्कादायक घटना घडली.
कुस्ती प्रशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल केला.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अकोला : आंतरशालेय कुस्ती स्पर्धेनिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्यांचे वजन करताना विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ (Akola Wrestling Coach Case) काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी (Student Viral Video) कुस्ती प्रशिक्षकाविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकोट फाईल येथील रहिवासी असलेल्या या कुस्ती प्रशिक्षकाचे नाव कुणाल माधवे असे आहे. याप्रकरणाने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले आहे.