Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी शहरातील यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड केली.
akola-yadnya-hospital-vandalism-after-patient-death damage relatives

akola-yadnya-hospital-vandalism-after-patient-death damage relatives

sakal

Updated on: 

अकोला - प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी शहरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ असलेल्या यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड केली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने उपचारात कोणतीही कसूर झाली नसल्याचे सांगत नातेवाइकांचे आरोप फेटाळले. या घटनेमुळे रणपिसे नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com