

Akola Protest Over Alleged CET and MPSC Paper Leak Youth Congress Climbs Water Tank Demands Action
sakal
अकोला: सीईटी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने बुधवारी (ता. २९) शहरात आक्रमक आंदोलन केले. तोष्णीवाल ले-आऊट येथील महापालिकेच्या जलकुंभावर चढून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.