

Self-Help Group Exhibition and Funding
sakal
अकोला : बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘वऱ्हाडी जत्रा’ भव्यतेमुळे चर्चेत आली असली, तरी तिच्या आयोजनामागील खर्च, नियोजन आणि प्रत्यक्ष प्रतिसाद या तिन्ही बाबींवरून जिल्हा परिषद अकोला प्रशासनावर तीव्र टीका सुरू झाली आहे. विकासाच्या नावाखाली मोठा खर्च करूनही पहिल्याच दिवशी नागरिकांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.