esakal | Akola : पोटनिवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : पोटनिवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Akola : पोटनिवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीत मतदान व मतमोजणीसह इतर प्रक्रिया योग्यरितीने पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत २ हजार ४२८ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या२८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट-८१, मूर्तिजापूर-८३, अकोला -८५, बाळापूर -७४, बार्शीटाकळी ४९, पातुर- ३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र आहेत. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २ हजार ४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय पोलिस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे.

२२ पथक तैनात

निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शीटाकळी व पातूर येथे प्रत्येकी एक पथकाचा समावेश आहे.

मद्यविक्री बंदचे निर्देश

पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित क्षेत्रात मद्यविक्री बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश देण्यात आले. त्यामुळे यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने योग्य कार्यवाही करण्यात येत आहे.

loading image
go to top